दहावी व बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर — यंदा परीक्षा दोन आठवडे लवकर!
24 प्राईम न्यूज 14 Oct 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, Pune यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10 वी (SSC) व 12 वी (HSC) बोर्ड परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा विद्यार्थ्यांना दोन आठवडे लवकर परीक्षांना सामोरं जावं लागणार आहे.

बारावी बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार आहे, तर दहावी बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान घेण्यात येईल. परंपरेनुसार दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीची परीक्षा मार्च महिन्यात सुरू होते. मात्र, यंदा या दोन्ही परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
या संदर्भात शासनाने अधिकृत परिपत्रक जारी केले असून, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना वेळापत्रकानुसार परीक्षा तयारीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तयारीत गती आणण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 128000
22 Ct सोने 91.60% : ₹. 117200
18 Ct सोने 75.00% : ₹. 97300
शुद्ध चांदी 999%:₹. 1780/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
