उदयनगर ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम — श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – उदयनगर :समृद्ध ग्रामविकासाची वाटचाल लोकसहभागातून शक्य असल्याचे उत्कृष्ट उदाहरण सोमवारी, दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी उदयनगर येथे पाहायला मिळाले. समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. या उपक्रमाने गावकऱ्यांमध्ये एकतेचा व विकासाचा संदेश दिला.
या वेळी गट विकास अधिकारी एन. आर. पाटील, लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ, उपसरपंच राकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, सुदाम सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी सोनी पाटील यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्था आणि पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमास वि.का.सह. सोसायटीचे माजी चेअरमन परशुराम पाटील, माजी सरपंच देविदास खैरनार, डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते राजेश वाघ, जितेंद्र पाटील, भास्कर कापडणे, राजेंद्र पुंडलिक पाटील, किशोर चव्हाण, सुभाष पाटील, तलाठी दीपक पाटील, कृषी सहाय्यक रोहिदास भामरे, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
श्रमदानानंतर “स्वच्छतेचा वार – सोमवार” या संकल्पनेतून गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता ग्रामविकासासाठी जनसहभाग किती प्रभावी ठरतो याचे हे एक उत्तम उदाहरण ठरले.


रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 128000
22 Ct सोने 91.60% : ₹. 117200
18 Ct सोने 75.00% : ₹. 97300
शुद्ध चांदी 999%:₹. 1780/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
