अनधिकृत रेती वाहतुकीवर कारवाई — दोन ट्रॅक्टर जप्त.
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : मौजे आर्डी – जवखेड़े रस्त्यावर आज महसूल विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत अनधिकृत गौण खनिज (रेती) वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. ही कारवाई मा. उपविभागीय अधिकारीसो अमळनेर भाग श्री. नितीनकुमार मुंडावरे साहेब तसेच मा. तहसीलदारसो अमळनेर श्री. रुपेश कुमार सुराणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर दोन्ही ट्रॅक्टर मुद्देमालासह तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आले आहेत.
या कारवाईसाठी महसूल विभागाचे पथक कार्यरत होते. पथकात श्री. पी. एस. पाटील (मंडळ अधिकारी, वावडे भाग), श्री. संदीप माळी (ग्राम महसूल अधिकारी, मांडळ), श्री. एम. आर. पाटील (ग्राम महसूल अधिकारी, जैतपीर), श्री. विक्रम कदम (ग्राम महसूल अधिकारी, शाहपुर), श्री. जितेंद्र पाटील (ग्राम महसूल अधिकारी, शिरसाले बु.), श्री. विकेश भोई (ग्राम महसूल अधिकारी, बाम्हने), अमोल चक्रे (ग्राम महसूल अधिकारी, जवखेड़े), आकाश गिरी (ग्राम महसूल अधिकारी, पातोंडा), सुधीर पाटील (ग्राम महसूल अधिकारी, गडखाब) व पवन शिंगारे (ग्राम महसूल अधिकारी, सावखेड़े) यांचा समावेश होता.
महसूल विभागाकडून अनधिकृत खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढेही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 127000
22 Ct सोने 91.60% : ₹. 116300
18 Ct सोने 75.00% : ₹. 96500
शुद्ध चांदी 999%:₹. 1700/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
