ओंकार स्वरूपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ए अँड डी फाउंडेशन तर्फे लहान मुलांना मोफत सुवर्णप्राशन डोस वितरण..
24 प्राईम न्यूज 11 Oct 2025
ए & डी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. अशोक श्रीपती गोरड यांच्या वाढदिवसानिमित्त ओंकार स्वरूपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. लहान मुलांच्या उज्वल भविष्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, बुद्धिमत्तेला चालना मिळावी तसेच आरोग्य निरोगी राहावे या उद्देशाने फाउंडेशनच्या माध्यमातून लहान मुलांना सुवर्णप्राशनाचा डोस मोफत देण्यात आला.
या प्रसंगी ओंकार स्वरूपा संस्थेचे संस्थापक आणि येळवी गावचे प्रथम नागरिक मा. सुनील अंकलगी (सरपंच), मा. निळे सर, शिक्षकवर्ग, महिला शिक्षक तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले असून, उपस्थित मान्यवरांनी ए & डी फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
