जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीसाठी विशेष सभा १३ ऑक्टोबरला…

0
New-Doc-10-11-2025-07.09-1.jpg

आबिद शेख/अमळनेर

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच विविध पंचायत समित्यांच्या आरक्षणासाठी सोडत पद्धतीने कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी विशेष सभा दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
या सभांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्यामधील स्त्रियांसाठी राखीव जागा तसेच सर्वसाधारण जागा निश्चित केल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेतील तसेच पंचायत समिती क्षेत्रातील नागरिकांना या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सभांचे ठिकाण व वेळ पुढीलप्रमाणे:
क्र. परिषद / पंचायत समितीचे नाव सभेचे ठिकाण तारीख व वेळ
1 जळगाव जिल्हा परिषद नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव 13.10.2025 – दु. 12.00 वा.
2 चोपडा पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, चोपडा 13.10.2025 – दु. 12.00 वा.
3 यावल पंचायत समिती तहसिल कार्यालय, यावल 13.10.2025 – दु. 3.00 वा.
4 रावेर पंचायत समिती तहसिल कार्यालय, रावेर 13.10.2025 – दु. 12.00 वा.
5 मुक्ताईनगर पंचायत समिती तहसिल कार्यालय, मुक्ताईनगर 13.10.2025 – दु. 12.00 वा.
6 बोदवड पंचायत समिती तहसिल कार्यालय, बोदवड 13.10.2025 – दु. 12.00 वा.
7 भुसावळ पंचायत समिती तहसिल कार्यालय, भुसावळ 13.10.2025 – दु. 12.00 वा.
8 जळगाव पंचायत समिती पंचायत समिती सभागृह, जळगाव 13.10.2025 – दु. 12.00 वा.
9 धरणगाव पंचायत समिती तहसिल कार्यालय, धरणगाव 13.10.2025 – दु. 3.00 वा.
10 अमळनेर पंचायत समिती नगरपरिषद सभागृह, अमळनेर 13.10.2025 – दु. 12.00 वा.
11 पारोळा पंचायत समिती तहसिल कार्यालय, पारोळा 13.10.2025 – दु. 3.00 वा.
12 एरंडोल पंचायत समिती पंचायत समिती सभागृह, एरंडोल 13.10.2025 – दु. 12.00 वा.
13 जामनेर पंचायत समिती पंचायत समिती बैठक हॉल, जामनेर 13.10.2025 – दु. 12.00 वा.
14 पाचोरा पंचायत समिती नगरपालिकेचे व्यापारी भवन, पाचोरा 13.10.2025 – दु. 12.00 वा.
15 भडगाव पंचायत समिती पंचायत समिती बैठक हॉल, भडगाव 13.10.2025 – दु. 12.00 वा.
16 चाळीसगाव पंचायत समिती तहसिल कार्यालय, चाळीसगाव 13.10.2025 – दु. 12.00 वा.
ज्या नागरिकांना या आरक्षण सोडतीबाबत रस आहे त्यांनी संबंधित ठिकाणी व निर्दिष्ट वेळेस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन पगरे यांनी केले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 125000

22 Ct सोने 91.60% : ₹. 114500

18 Ct सोने 75.00% : ₹. 95000

शुद्ध चांदी 999%:₹. 1700/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed