आमदार अनिल पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे. — जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचा ठराव..

0
New-Doc-10-11-2025-06.57.jpg


आबिद शेख/अमळनेर

जळगाव :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) अल्पसंख्यांक विभागाच्या जळगाव जिल्हा आढावा बैठकीत आमदार अनिल भाईदास पाटील यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान द्यावे, असा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. ही बैठक पक्षाचे राज्यप्रमुख ॲड. नाझेर काझी यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली.

बैठकीच्या प्रारंभी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अल्पसंख्यांक समाजासमोरील विविध प्रश्न, पक्षविस्तारासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बळकटीकरणावर सखोल चर्चा झाली.

जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगताद्वारे आणि निवेदनांद्वारे आमदार अनिल भाईदास पाटील यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्याची ठाम मागणी राज्यप्रमुखांसमोर मांडली. या मागणीला उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या ठरावास अमळनेर शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खाटीक, तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष अलीम मुजावर, तसेच शहराध्यक्ष कलीम शेख यांनी जोरदार पाठिंबा दर्शविला. उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत “दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांना मंत्री करा”, “अजितदादा पवार यांचे नेतृत्व अमर रहे” आणि “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंदाबाद” अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.

या प्रसंगी मा. मंत्री गुलाबराव देवकर, आमदार मनीष जैन, जळगाव लोकसभा अध्यक्ष संजय पवार, रावेर लोकसभा अध्यक्ष उमेश नेमाडे, तसेच पक्ष नेत्या प्रतिभा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचालन संयोजकांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले. बैठकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 125000

22 Ct सोने 91.60% : ₹. 114500

18 Ct सोने 75.00% : ₹. 95000

शुद्ध चांदी 999%:₹. 1700/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed