राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत भारती वानखेडे आणि शीतल राणेराजपुत यांचा संयुक्त प्रथम क्रमांक..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : नाशिक येथील धनदीप बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत शिरपूरच्या भारती देविदास वानखेडे आणि जळगावच्या शीतल प्रमोद राणेराजपुत यांनी संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अमळनेर येथील जी. एस. हायस्कूलच्या आय. एम. ए. सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनदीप फाउंडेशनच्या अध्यक्षा यमुताई अवकाळे उपस्थित होत्या. महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरण या विषयावर आधारित “शिकलेली स्त्री – कुटुंबाची आणि राष्ट्राची आधारशीला”, “आजच्या युगात महिलांचे शिक्षण किती महत्त्वाचे”, “शिक्षणामुळे घडणारी स्त्री : काल, आज आणि उद्याचे चित्र”, “आजची महिला आणि सोशल मीडिया”, तसेच “माझ्या आयुष्यातील एक आदर्श महिला व्यक्तिमत्व” या विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून इनर्व्हील क्लबच्या अश्विनी गुजराती, एस. एम. पाटील, अशोक इसे आणि वाल्मिक मराठे उपस्थित होते. यावेळी नारायणी भजनी मंडळ व शारदा भजनी मंडळ यांनी सुरेल भजन-गीते सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.
अध्यक्षा यमुताई अवकाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “स्पर्धकांच्या बुद्धिमत्ता आणि संवेदनशीलतेने त्यांचे मनोबल उंचावले आहे. महिलांना प्रसन्नता, एकाग्रता आणि आनंद हे गुण अधिक सक्षम बनवतात.”
स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे –
🟢 प्रथम क्रमांक : भारती देविदास वानखेडे (शिरपूर) आणि शीतल प्रमोद राणेराजपुत (जळगाव)
🟢 द्वितीय क्रमांक : पल्लवी जगतराव शिंदे (चोपडा) आणि अपेक्षा किशोर पाटील (शिरूड)
🟢 तृतीय क्रमांक : सायली महेश भामरे (अमळनेर) आणि जयश्री दिलीप पवार (नाशिक)
🟢 उत्तेजनार्थ : अश्विनी अविनाश चौधरी, वर्षा वासुदेव शितोळे, ममता सुभाष महालपुरे, माधुरी भरत पाटील, पूनम साळुंखे आणि वैशाली नांद्रे (धुळे).
विजेत्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षिसे आणि दिवाळी भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षिका सुनीता पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
निबंध स्पर्धेचे परीक्षण कवयित्री सुनीता कपाळे आणि साहित्यिक विजयकुमार पांचाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा वाल्मिक मराठे यांनी तर आभार प्रदर्शन छाया अशोक इसे यांनी केले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 125000
22 Ct सोने 91.60% : ₹. 114500
18 Ct सोने 75.00% : ₹. 95000
शुद्ध चांदी 999%:₹. 1700/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
