सेवासयोग फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना स्कूल किट वाटपग्रामीण भागातील शिक्षण आणि सामाजिक उपक्रमांसाठी उपक्रमशील पुढाकार..

0
New-Doc-10-10-2025-07.00.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मठगव्हाण/नालखेडा येथे सेवासयोग फाउंडेशनतर्फे इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी श्री. प्रमोद पाटील, केंद्रप्रमुख श्री. सुनील चौधरी, सेवा सहयोग फाउंडेशनचे कार्यकर्ते श्री. अशोक शांताराम इसे, ग्रामपंचायत सरपंच श्री. तारकेश्वर गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. शिवदास शिरसाट आणि सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी फाउंडेशनच्या पालक कार्यकर्त्या सौ. छाया अशोक इसे यांनी फाउंडेशनतर्फे ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या कृषी विषयक, पाणी संवर्धनाशी संबंधित तसेच विद्यार्थी विकासाच्या विविध उपक्रमांची माहिती ग्रामस्थांना दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता लोहारे यांनी सेवासयोग फाउंडेशनचे संचालक श्री. गुणवंत सोनवणे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या प्रसंगी शिक्षक श्री. विजय बिराडे, सौ. वैशाली पितृभक्त, श्री. विलास बिरारी, श्री. प्रेमराज पवार आणि सौ. अश्विनी पाटील उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 127000

22 Ct सोने 91.60% : ₹. 116300

18 Ct सोने 75.00% : ₹. 96500

शुद्ध चांदी 999%:₹. 1660/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed