चाळीसगाव तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत ‘नॅशनल हायस्कूल’ विजेता.
24 प्राईम न्यूज 10 Oct 2025

चाळीसगाव – चाळीसगाव तालुकास्तरीय अंडर-14 शालेय क्रिकेट (लेदर बॉल) स्पर्धेत नॅशनल हायस्कूल, चाळीसगाव या संघाने शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
संघाने स्पर्धेत सुरेख फलंदाजी, गोलंदाजी आणि संघभावनेच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करत विजेतेपद मिळवले. या यशामागे संघाचे मार्गदर्शक व शारीरिक शिक्षण शिक्षक मोहसिन सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंद यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

