रस्त्यावर सापडलेली कागदपत्रांनी भरलेली बॅग मूळ मालकाला परत – प्रकाश पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक..

0
New-Doc-10-10-2025-06.45.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : तालुक्यातील बोहरा येथील माजी उपसरपंच प्रकाश ओंकार पाटील यांनी रस्त्यावर सापडलेली मूळ कागदपत्रांनी भरलेली बॅग मूळ मालकाला परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रकाश पाटील हे सोनगीरवरून परत येत असताना अजंदे–वालखेडा दरम्यान रस्त्यावर त्यांना एक बॅग आढळली. त्यांनी तत्काळ ती उचलून मारवड येथे येत पत्रकार डॉ. विलास पाटील यांच्या संपर्कात येऊन ती मारवड पोलिस ठाण्यात जमा केली.

पोलिसांनी बॅगेतील कागदपत्रांवरून चौकशी केली असता, ती बॅग सोनगीर येथील दिनेश सुरेश देवरे यांची असल्याचे समोर आले. कळताच दिनेश देवरे यांनी तातडीने पोलिस ठाण्यात येऊन आपली बॅग ताब्यात घेतली. या बॅगेत आधारकार्ड, पॅनकार्ड, न्यायालयीन कागदपत्रे आणि इतर महत्त्वाची मूळ कागदपत्रे होती.

या प्रामाणिक कृतीबद्दल एपीआय जीभाऊ पाटील यांनी प्रकाश पाटील यांचा विशेष सत्कार केला. यावेळी पत्रकार डॉ. विलास पाटील, हेडकॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी, दिनेश देवरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांनी प्रकाश पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे आणि तत्परतेचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 127000

22 Ct सोने 91.60% : ₹. 116300

18 Ct सोने 75.00% : ₹. 96500

शुद्ध चांदी 999%:₹. 1660/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed