मुख्य न्यायमूर्ती गवई यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर वकील संघाचे कामबंद आंदोलन..

0
New-Doc-10-09-2025-09.13.jpg

आबिद शेख/अमळनेर वकील संघाची तातडीची बैठक काल (दि. ७ ऑक्टोबर) संघाचे अध्यक्ष अॅड. किरण अ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत सर्वानुमते ठराव पारित करून आज (दि. ८ ऑक्टोबर) न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमळनेर वकील संघाने जिल्हा व सत्र न्यायाधीश, अमळनेर यांना निवेदन सादर केले असून, या निवेदनाच्या प्रती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तसेच अमळनेर येथील वरिष्ठ आणि कनिष्ठ दिवाणी न्यायाधीशांना देण्यात आल्या आहेत.

संघाच्या निवेदनात म्हटले आहे की — “हा हल्ला केवळ मा. मुख्य न्यायमूर्ती गवई साहेबांवर झालेला नसून, तो न्यायव्यवस्था आणि संविधानाच्या मूल्यांवर झालेला गंभीर आघात आहे. अशा घटनांचा तीव्र निषेध करत आम्ही न्यायव्यवस्थेच्या गौरवाचे रक्षण करण्यासाठी एकजुटीने उभे आहोत.”

या आंदोलनामुळे अमळनेर न्यायालयातील नियमित कामकाजावर परिणाम झाला असून, सर्व वकीलांनी शांततेत निषेध नोंदविला.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 126000

22 Ct सोने 91.60% : ₹. 115400

18 Ct सोने 75.00% : ₹. 95800

शुद्ध चांदी 999%:₹. 1590/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed