मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा उपक्रम — एचआयव्ही व क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी समुपदेशन सत्र..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर :लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे “Service Week – Mental Health & Well-Being” या सेवा सप्ताहांतर्गत एचआयव्ही आणि क्षयरोग (TB) ग्रस्त रुग्णांसाठी विशेष समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. हे सत्र ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे पार पडले.
या सत्राचा उद्देश रुग्णांना मानसिक बळ देणे, आजाराविषयी योग्य माहिती देणे तसेच उपचारादरम्यान निर्माण होणाऱ्या ताणतणावावर मात करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा होता. तज्ज्ञांनी दिलेल्या समुपदेशनाद्वारे रुग्णांना भावनिक आधार मिळाला, ज्यामुळे उपचार पाळण्यामध्ये सुधारणा होण्यास आणि समाजातील आजाराविषयी असलेला कलंक कमी करण्यास मदत झाली. परिणामी, रुग्णांचा आत्मविश्वास वाढून त्यांचे सामाजिक व मानसिक आरोग्य अधिक बळकट झाले.
या कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील, डॉ. प्रकाश तळे, डॉ. आशिष पाटील, एआरटी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शिंदे, आयुष विभागाचे डॉ. परेश पवार, आयसीटीसी समुपदेशक श्री. अश्वमेध पाटील व श्री. दीपक शेलार, एआरटी समुपदेशक श्री. जयेश मोरे, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. देवेंद्र मोरे, श्री. अजमल मणियार, क्षयरोग विभागाचे श्री. रमाकांत सैंदाणे व श्री. संदीप अहिरराव, तसेच नर्सिंग इन्चार्ज सौ. सुजाता वळवी उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन लायन्स क्लब अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव लायन महेंद्र पाटील, खजिनदार लायन नितीन विचुंरकर, प्रकल्प अध्यक्ष लायन डॉ. प्रशांत शिंदे, लायन उदय शाह, लायन डॉ. युसुफ पटेल आणि लायन रुपेश मणियार यांनी केले.
रुग्ण आणि उपस्थितांनी या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 126000
22 Ct सोने 91.60% : ₹. 115400
18 Ct सोने 75.00% : ₹. 95800
शुद्ध चांदी 999%:₹. 1590/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
