जळगावला नवे जिल्हाधिकारी – आयएएस रोहन घुगे यांची नियुक्ती..

0
New-Doc-10-08-2025-09.43.jpg

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज आदेश जारी करत जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (भाप्रसे) यांची बदली नाशिक येथे केली आहे. तेथे ते आगामी महाकुंभ मेळ्याच्या ऐतिहासिक जबाबदारीची सूत्रे हाती घेणार आहेत.

आयुष प्रसाद यांनी जळगावमधील कार्यकाळात अनेक प्रशासकीय सुधारणा राबवत जनहिताचे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यशैलीमुळे ते जनतेत लोकप्रिय ठरले होते.

त्यांच्या जागी आता आयएएस रोहन घुगे यांची जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. घुगे हे यापूर्वी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. नवोन्मेषी विचारसरणी आणि प्रत्यक्ष जमीनी कामासाठी ओळखले जाणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.

शासनाने त्यांना कोकण विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 123700

22 Ct सोने 91.60% : ₹. 113300

18 Ct सोने 75.00% : ₹. 94000

शुद्ध चांदी 999%:₹. 1560/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed