आता रेल्वेच्या कन्फर्म तिकिटाची तारीख मोफत बदलता येणार!

0
New-Doc-10-08-2025-09.32.jpg

24 प्राईम न्यूज 8 Oct 2025

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता कन्फर्म रेल्वे तिकिटाची प्रवासाची तारीख बदलण्याची मोफत सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेसाठी प्रवाशांना कोणतीही कॅन्सलेशन फी किंवा अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

ही नवी सुविधा जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले की, प्रवासी आपले कन्फर्म तिकिटाचे प्रवास दिनांक ऑनलाइन बदलू शकतील. मात्र, तारीख बदलल्यानंतर नवीन तारखेला सीटची हमी नसेल, ती सीट उपलब्धतेवर आधारित असेल.

उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे २० नोव्हेंबरला ठाणे ते मडगाव प्रवासाचे कन्फर्म तिकिट असेल आणि काही कारणास्तव तुमचा प्रवास २५ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलायचा असेल, तर तुम्हाला नवीन तिकिट घेण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या विद्यमान तिकिटाची तारीख ऑनलाइन बदलू शकता आणि त्या तिकिटानेच नवीन तारखेला प्रवास करू शकता.

या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे — कोणतेही पैसे कापले जाणार नाहीत आणि प्रवाशांना हा बदल पूर्णपणे मोफत करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने ही सुविधा प्रवाशांच्या सोयीसाठी आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 123700

22 Ct सोने 91.60% : ₹. 113300

18 Ct सोने 75.00% : ₹. 94000

शुद्ध चांदी 999%:₹. 1560/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed