सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणाऱ्या वकील राकेश किशोर यांच्यावर कठोर कारवाई करा – एकता संघटनेची मागणी
24 प्राईम न्यूज 8 Oct 2025

जळगाव –एकता संघटनेचे वकील ॲड. आवेश शेख, ॲड. आमिर शेख आणि ॲड. अल्तमश शेख यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमंत हरकर यांना निवेदन देऊन सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्याबद्दल वकील राकेश किशोर यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या संदर्भात घडलेल्या अश्लील आणि अपमानास्पद घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान वकील राकेश किशोर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांबरोबरच न्यायमूर्तींकडे चप्पल फेकण्याच्या प्रकाराचा उल्लेख करत संघटनेने या घटनेला “संविधान, न्यायव्यवस्था आणि धार्मिक सौहार्दावर थेट हल्ला” असे संबोधले आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- वकील राकेश किशोर यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९९, १९६ आणि ३५२ तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ च्या कलम ३(१)(आर) आणि ३(१)(एस) अंतर्गत कठोर दंडात्मक कारवाई करावी.
- बार कौन्सिल ऑफ इंडियाला त्यांच्या वकिली परवान्याचा तात्काळ रद्द करण्याचे निर्देश द्यावेत.
- सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने या प्रकरणात अद्याप एफआयआर दाखल केली नसल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून पोलिस विभागाने स्वतःहून तक्रार नोंदवावी.
- अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून न्यायालय परिसरात कठोर आचारसंहिता आणि सुरक्षा व्यवस्था लागू करावी.
- न्यायव्यवस्थेचा सन्मान आणि समाजात धर्मनिरपेक्ष सौहार्द टिकवण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी.
संघटनेची भूमिका:
संघटनेने नमूद केले आहे की वकील राकेश किशोर यांनी आपल्या कृतीबद्दल कोणतीही खेदाची भावना न दाखवता माफी मागण्यास नकार दिला आहे. “ही केवळ सर्वोच्च न्यायालयाचा नव्हे तर न्यायव्यवस्थेचा अपमान करणारी कृती आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांनी स्पष्ट केले की, “देशाच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला म्हणजेच संपूर्ण संविधानावर हल्ला आहे. अशा घटनेवर सरकार आणि न्यायसंस्थेने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.”
निवेदनाच्या प्रती खालील अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत:
पोलीस अधीक्षक जळगाव, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, कायदा मंत्री भारत सरकार, बार कौन्सिल ऑफ इंडिया (नवी दिल्ली), आणि सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल (नवी दिल्ली).
शिष्टमंडळात उपस्थित:
फारुख शेख, हाफिज रहीम पटेल, नदीम मलिक, अन्वर शिकलगार, अनीस शाह, कासिम उमर, ॲड. आवेश शेख, ॲड. आमिर शेख, ॲड. अल्तमश शेख, आरिफ देशमुख, मौलाना गुफरान, मौलाना कासिम नदवी, मौलाना वसीम पटेल, रज्जाक, युसूफ खान आदी.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 123700
22 Ct सोने 91.60% : ₹. 113300
18 Ct सोने 75.00% : ₹. 94000
शुद्ध चांदी 999%:₹. 1560/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
