अमळनेरमध्ये अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाविरोधात उपोषणाचा इशारा!मुख्याधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर नागरिकाचा संताप – परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज..

0
New-Doc-10-07-2025-22.58.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषदेच्या हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाविरोधात प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे अखेर नागरिकाने उपोषणाचा मार्ग पत्करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमळनेर येथील राजेश प्रभाकर पवार (रा. गुलाबराव सदन, कचेरी रोड, अमळनेर) यांनी दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई; जिल्हाधिकारी जळगाव; तसेच उपविभागीय अधिकारी अमळनेर यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून, मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर यांच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून उपोषण करण्याची परवानगी मागितली आहे अर्जदार राजेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार,
मौजे अमळनेर येथील टी.पी. नं. २२०/३/२ या भूखंडावर त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची दुमजली इमारत आहे.
त्याच इमारतीच्या पूर्वेकडे टी.पी. नं. २२०/४ या भूखंडावर बलराम कोटमल फतवाणी यांनी अंदाजे ८५० चौरस फूट बेसमेंट आणि ७०० चौरस फूट तळमजल्यावर अनधिकृत बांधकाम केले आहे.
या संदर्भात नगरपरिषदेने २०१४ मध्ये एम.आर.टी.पी. कायद्याच्या कलम ५२ व ५३ अंतर्गत नोटीस देऊनही अद्याप कारवाई केलेली नाही.
अर्जदारांनी या अनधिकृत बांधकामाविरोधात २०१५ साली दिवाणी न्यायालयात रेग्युलर मुकदमा क्रमांक २६/२०१५ दाखल केला असून न्यायालयाने बांधकाम पुढे न करावे असा मनाई हुकूम दिलेला आहे. तरीही नगरपरिषदेने कारवाई न केल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे.
दुसरे प्रकरण: फूटपाथवरील अतिक्रमण
राजेश पवार यांनी नगरपरिषदेच्या आययूडीपी शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकान क्रमांक १ भाडेकरारावर घेतले असून, त्या ठिकाणी ते फोटोग्राफीचा व्यवसाय करतात.
त्यांच्या दुकानालगत असलेल्या दुकान क्र. १ चे भोगवटदार नारायण मोतीसिंग राजपुरोहित यांनी
दुकानाच्या दक्षिण व पूर्व बाजूस असलेल्या फूटपाथवर लोखंडी जिना उभारला आहे,
तसेच त्याच फूटपाथवर ‘राजस्थान स्वीट मार्ट’च्या शेगड्या ठेवून अतिक्रमण केले आहे.
तसेच दुकान क्र. ५६ (शिवशक्ती पावभाजी) यांनीही फूटपाथवर पावभाजी गाडी ठेवून मार्ग अडविल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या संदर्भात नगरपरिषदेकडून २२ एप्रिल २०२५ रोजी नोटीस काढण्यात आली असली तरी प्रत्यक्ष कारवाई आजतागायत झालेली नाही, अशी तक्रार अर्जदारांनी मांडली आहे.
मुख्याधिकाऱ्यांवर संगनमताचा आरोप
राजेश पवार यांनी आपल्या अर्जात स्पष्टपणे नमूद केले आहे की,

“मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर हे दोन्हीही अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण प्रकरणात कोणतीही प्रत्यक्ष कारवाई करीत नाहीत. उलट त्यांनी संबंधित मालक आणि भोगवटदारांशी संगनमत केल्याचे दिसून येते.”

त्यामुळे आपल्या रहिवास आणि व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्येबाबत त्यांनी वारंवार तक्रारी करूनही निष्क्रियता कायम असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या सर्व प्रकारामुळे त्रस्त होऊन अर्जदारांनी नगरपरिषद अमळनेरच्या आवारात किंवा समोर आमरण उपोषण करण्याची परवानगी मागितली आहे.
“माझ्या कायदेशीर हक्कांसाठी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात शांततामय मार्गाने उपोषण करणार आहे,” असे पवार यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.
अमळनेर शहरात अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाविरोधात दीर्घकाळ प्रलंबित तक्रारींमुळे नागरिकांत नाराजी वाढत आहे. आता याच मुद्द्यावर नागरिकाने थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारल्यामुळे नगरपरिषदेच्या कामकाजावर आणि मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 123700

22 Ct सोने 91.60% : ₹. 113300

18 Ct सोने 75.00% : ₹. 94000

शुद्ध चांदी 999%:₹. 1560/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed