धनोरा ग्रामीण रुग्णालयात सिकल सेल व्यवस्थेचा जिल्हाधिकाऱ्यांचा आढावाडॉ. मिताली शेट्टी यांनी दिल्या विशेष सूचना; रुग्णालयाच्या कामाचे कौतुक.

0
New-Doc-10-07-2025-06.54.jpg

24 प्राईम न्यूज 7 Oct 2025

धानोरा (जि. गडचिरोली) : जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी सोमवारी धानोरा ग्रामीण रुग्णालयाचा अचानक दौरा करत सिकल सेल रोग व्यवस्थापनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून रुग्णांशी थेट चर्चा केली आणि सिकल सेल रुग्णांचे स्वतंत्र रेकॉर्ड ठेवण्याच्या विशेष सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. शेट्टी यांनी सिकल सेल प्रकरणांची सविस्तर माहिती घेत आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीची चौकशी केली. रुग्णालयातील वॉर्डांना भेट देत त्यांनी रुग्णांची विचारपूस केली आणि त्यांच्या उपचाराबाबत समाधान व्यक्त केले. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सिकल सेल रुग्णांचे नियमित फॉलोअप घेऊन त्यांच्या नोंदी स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना दिल्या.

रुग्णालय परिसरातील स्वच्छता, व्यवस्थापन आणि ‘टाकावू पासून टिकावू’ या उपक्रमाचे जिल्हाधिकारींनी विशेष कौतुक केले. तसेच रुग्णालयाच्या विविध विभागांची पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले.

या पाहणीवेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी उपस्थित होते. त्यांनी पीएम रूमची पाहणी करत व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले.

रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रीति पटले यांनी जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांचे रोप व कुंडी भेट देऊन स्वागत केले.

सिकल सेल व्यवस्थापनातील सुधारणेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा हा दौरा आरोग्य विभागासाठी दिशा दर्शक ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed