१२ ऑक्टोबरला मा. आबासाहेब डॉ. बी. एस. पाटील यांचा ‘सहस्त्रचंद्र दर्शन सेवा-स्फूर्ती सोहळा’

0
New-Doc-10-08-2025-06.35.jpg

आबिद शेख/अमळनेर अमळनेर शहरात एक प्रेरणादायी सोहळा पार पडणार आहे. ज्ञान, कर्तृत्व आणि सामाजिक कार्याचा गौरव करणारा “सहस्त्रचंद्र दर्शनरूपी सेवा-स्फूर्ती सोहळा” मा. आबासाहेब डॉ. बी. एस. पाटील यांचा रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हा विशेष सोहळा आदिवासी आश्रमशाळा, एस.ई.बी. सब स्टेशन जवळ, टाकरखेडा रोड, ताडेपुरा-अमळनेर (जि. जळगाव) येथे पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. अरुणभाई गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष, चोपडा यांनी स्वीकारले असून, प्रमुख पाहुणे म्हणून मा. आ. श्री. अमरीशभाई पटेल, माजी शिक्षणमंत्री व भाग्यविधाता, शिरपूर उपस्थित राहणार आहेत. तसेच, मा. श्री. प्रा. प्रकाशजी पाठक, सनदी लेखापाल (सी.ए.), धुळे यांच्या शुभहस्ते विशेष पुस्तक प्रकाशन होणार आहे.

हा सोहळा डॉ. निनाद बी. पाटील, सौ. सुनिता बी. पाटील आणि डॉ. सौ. अर्चना निनाद पाटील यांच्या पुढाकाराने नाविन्य प्रतिष्ठान, अमळनेर तर्फे आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी आयोजकांनी विनंती केली आहे की, या सोहळ्यास येताना कोणतीही भेटवस्तू, फुलहार किंवा गुच्छ आणू नये, तसेच कार्यक्रमानंतर सुग्रास भोजनाचा आस्वाद घ्यावा हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा म्हणजे एका सेवाभावी प्रवासाचा गौरव आणि नव्या प्रेरणेचा उत्सव ठरणार आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 123700

22 Ct सोने 91.60% : ₹. 113300

18 Ct सोने 75.00% : ₹. 94000

शुद्ध चांदी 999%:₹. 1560/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed