कोल्ड्रिफ सिरपचा वापर तात्काळ थांबवा! महाराष्ट्र एफडीएचे नागरिकांना आवाहन.

0
New-Doc-10-07-2025-06.44.jpg

24 प्राईम न्यूज 7 Oct 2025


मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोल्ड्रिफ सिरपमुळे आरोग्य विभागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी या औषधाच्या एका विशिष्ट बॅचचा वापर व विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

तमिळनाडू औषध नियंत्रण प्राधिकरणाच्या अहवालानुसार, श्रीसन फार्मास्युटिकल्स, कांचीपुरम यांनी तयार केलेल्या कोल्ड्रिफ सिरप (बॅच नं. SR 13; उत्पादन तारीख: मे 2025; समाप्ती: एप्रिल 2027) या नमुन्यात डायथिलीन ग्लायकोल हे विषारी रसायन (४८.६% w/w) आढळले आहे. हे रसायन अत्यंत हानिकारक असून आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.

छिंदवाडा (म.प्र.) जिल्ह्यात या खोकल्याच्या सिरपच्या सेवनामुळे १४ मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला असून, मूत्रपिंड निकामी होण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

यावर तात्काळ कारवाई करत महाराष्ट्र एफडीएने राज्यातील सर्व औषध निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्तांना निर्देश दिले आहेत की, संबंधित बॅचचा साठा तातडीने गोठवण्यात यावा. किरकोळ विक्रेते, घाऊक व्यापारी आणि रुग्णालयांमध्ये तपास सुरू करण्यात आला आहे.

एफडीएने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणाकडे कोल्ड्रिफ सिरपचा बॅच क्रमांक SR 13 असेल, तर ते त्वरित जवळच्या औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे जमा करावे आणि त्याचा वापर टाळावा या बॅचमध्ये विषारी डायथिलीन ग्लायकोल मिसळले गेल्याचा संशय असून, ते आरोग्यास अत्यंत घातक आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 123500

22 Ct सोने 91.60% : ₹. 113100

18 Ct सोने 75.00% : ₹. 93900

शुद्ध चांदी 999%:₹. 1550/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed