मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी ‘मेंटल हेल्थ मॅटर्स’ कार्यक्रमाचे आयोजन..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर :लायन्स क्लब ऑफ अमळनेरतर्फे सेवा सप्ताहानिमित्त ‘मेंटल हेल्थ मॅटर्स’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ व प्रेरणादायी वक्ते डॉ. आदित्य महेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व समजावून दिले.
हा कार्यक्रम ६ ऑक्टोबर रोजी सायं. ४ वाजता PBA इंग्लिश मीडियम स्कूल, अमळनेर येथे पार पडला.
डॉ. महेश्वरी यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढता ताण, आत्मविश्वासाची घसरण आणि मानसिक असंतुलन या विषयांवर अतिशय प्रभावीपणे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकंच महत्त्वाचं आहे. स्वतःला वेळ देणं, संवाद साधणं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हे मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.”
या कार्यक्रमात लायन्स क्लब अध्यक्ष संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर, तसेच मुखध्यापक जिजाबराव देवरे उपस्थित होते. विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमात पाहायला मिळाला.
‘We Serve’ या भावनेतून लायन्स क्लब ऑफ अमळनेरने समाजात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम राबवून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 123500
22 Ct सोने 91.60% : ₹. 113100
18 Ct सोने 75.00% : ₹. 93900
शुद्ध चांदी 999%:₹. 1550/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
