अमळनेरमध्ये ठाकरे व्हिला शेजारील घराला आग; वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर │ शहरातील विद्याविहार कॉलनी परिसरात ठाकरे व्हिला शेजारी असलेल्या रवींद्र मोतीराम पाटील यांच्या बंद घराला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. घरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
घटनास्थळी नागरिकांनी धुराचे लोट पाहताच तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. काही मिनिटांतच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत घरातील काही वस्तूंचे नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि अग्निशमन विभाग या घटनेचा तपास करीत आहेत. स्थानिकांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या जलद कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याची प्रतिक्रिया परिसरात व्यक्त होत आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 123500
22 Ct सोने 91.60% : ₹. 113100
18 Ct सोने 75.00% : ₹. 93900
शुद्ध चांदी 999%:₹. 1550/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
