पत्रकार ते जनसेवक! — जितेंद्र ठाकूर नगराध्यक्ष पदासाठी रणसज्ज. स्पष्टवक्ते, निर्भीड पत्रकार आणि समाजाभिमुख कार्यकर्त्याच्या उमेदवारीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर :शहरातील सुपरिचित पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र (जितू) ठाकूर यांनी अमळनेर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची घोषणा केली आहे. दीर्घकाळ निर्भीड व सडेतोड पत्रकारितेद्वारे सर्वसामान्य जनतेच्या समस्या मांडणाऱ्या ठाकूर यांनी आता थेट जनसेवेच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
६ ऑक्टोबर रोजी अमळनेर नगराध्यक्ष पदासाठी एसटी प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम शहरात चर्चेत आलेले नाव म्हणजे जितेंद्र ठाकूर. अनेक वर्षांपासून त्यांनी भ्रष्टाचार, प्रशासनातील त्रुटी, नागरी समस्या आणि नागरिकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे. त्यांचे लेखन आणि बातम्या वेळोवेळी चर्चेत राहिल्या असून त्यांनी सामाजिक आणि लोकहिताच्या अनेक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
“समस्या दाखवणं हे माझं कर्तव्य होतं; आता त्या सोडवण्यासाठी पुढे येणं ही माझी जबाबदारी आहे,”
— असे सांगत ठाकूर यांनी आपल्या निर्णयामागील भावनिक व तात्विक भूमिका मांडली.
त्यांचा उद्देश अमळनेरचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन, आणि नागरिकांचा थेट सहभाग असलेली लोकाभिमुख कार्यपद्धती राबविणे हा आहे, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले.
शहरातील विविध सामाजिक संस्था, युवक वर्ग, व्यावसायिक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी ठाकूर यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
पत्रकार म्हणून शहरातील प्रत्येक घटकांशी थेट संपर्क असलेल्या जितेंद्र ठाकूर यांची प्रतिमा स्पष्टवक्ते, प्रामाणिक आणि सर्वांना न्याय देणारे व्यक्तिमत्व अशी आहे. त्यांच्या भोवती असलेला मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांचा मजबूत गोतावळा हे त्यांच्या प्रचारातील मोठे बळ मानले जात आहे.
नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात असले तरी जितेंद्र ठाकूर यांची पारदर्शक प्रतिमा, लोकांशी असलेला थेट संवाद आणि पत्रकारितेतील अनुभव यामुळे त्यांचे नाव विशेष ठरते आहे. “अमळनेरच्या विकासासाठी ठाम नेतृत्वाची गरज आहे, आणि ती भूमिका जितेंद्र ठाकूर समर्थपणे निभावू शकतात,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
आगामी निवडणुकीत पत्रकार ते जनसेवक असा प्रवास सुरू करणाऱ्या जितेंद्र ठाकूर यांच्याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 123500
22 Ct सोने 91.60% : ₹. 113100
18 Ct सोने 75.00% : ₹. 93900
शुद्ध चांदी 999%:₹. 1550/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
