अमळनेर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी माजी सैनिक विनोद बोरसे यांची निवड..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असलेल्या अमळनेर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदाचा तिढा अखेर लोकशाही मार्गाने सुटला आहे. शनिवारी (दि. ४ ऑक्टोबर २०२५) अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर येथे पारदर्शक मतदान प्रक्रियेतून माजी सैनिक विनोद शालिग्राम बोरसे (पोलीस पाटील, सात्री) यांनी विजय मिळवत तालुकाध्यक्षपदावर निवड झाली.
या निवडणुकीत बोरसे यांना ६४ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी लखीचंद रमेश पाटील (जिल्हा सचिव) यांना ५४ मते मिळाली. राज्याध्यक्ष बाळासाहेब बाजीराव शिंदे, राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राज्य संघटक भाऊसाहेब पाटील, निळकंठ थोरात, साहेबराव राळे पाटील, महिला आघाडी अध्यक्षा तृप्ती मांडेकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणी हांडे पाटील, राज्य सदस्य लीलाताई पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष नरेंद्र शिंदे, धुळे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील सर्व मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक आणि शांततेत पार पडली. विजयानंतर राज्याध्यक्ष शिंदे यांच्या हस्ते विनोद बोरसे यांना तालुकाध्यक्षपदाची सनद देण्यात आली. लवकरच नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात येईल, असे बोरसे यांनी सांगितले.
या विजयानंतर तालुक्यासह जिल्हाभरातील पोलीस पाटील, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी विनोद बोरसे यांचे अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 121500
22 Ct सोने 91.60% : ₹. 111300
18 Ct सोने 75.00% : ₹. 92400
शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
