मराठा आरक्षणासाठी शिंदे, फडणवीस आणि विखे पाटील यांचे योगदान – आमदार नरेंद्र पाटील..

0
New-Doc-10-05-2025-21.51.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : स्वातंत्र्यानंतर देशात जातीपातीचे राजकारण सुरू झाले. सर्वप्रथम अण्णासाहेब पाटील यांनी आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली होती. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात जाती-जातींमध्ये अंतर निर्माण झाले आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मराठ्यांना आरक्षण मिळाले, असा दावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी केला.

ते अमळनेर येथे आयोजित मराठा समाजभूषण पुरस्कार वितरण व गुणवंतांचा गौरव सोहळा या कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम अमळनेर तालुका मराठा समाज तर्फे मराठा मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी समाजभूषण पुरस्कार वितरणासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नव्या भोजन कक्षाचे भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेरचे आमदार अनिल पाटील होते. ते म्हणाले, “समाजाच्या संचालक मंडळाकडून चांगली कामे होत आहेत. समाजातील गुणवंत व्यक्तींना प्रोत्साहन देऊन समाजाची ताकद वाढवावी. प्रत्येकाने वर्षातून एक दिवस समाजासाठी द्यावा.” तसेच, अमळनेर तालुक्यातील मराठा तरुणांना उद्योगासाठी आर्थिक महामंडळातून मदत देण्याचे आवाहनही त्यांनी आमदार नरेंद्र पाटील यांना केले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार स्मिता वाघ, आमदार अमोल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, सभापती अशोक पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी जिप सदस्या जयश्री पाटील, तिलोत्तमा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजभूषण पुरस्काराने डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, आरटीओ मयूर निकम, जेष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील, ढेकू बु. उपसरपंच नत्थू सोनवणे, अमळगाव सरपंच गिरीश पाटील आदींचा सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक अध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केले.
कार्यक्रमास सचिव विक्रांत पाटील, सहसचिव प्रवीण पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे, तसेच एस.एम. पाटील, मनोहर पाटील, चंद्रकांत काटे, स्वप्नील पाटील, जे.पी. पाटील, संजय पुनाजी पाटील, कैलास पाटील, डॉ. सुमित पाटील, गौरव पाटील, भूषण भदाणे, सुलोचना वाघ, पद्मजा पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान समाजासाठी देणग्याही जाहीर करण्यात आल्या —
नत्थू सोनवणे यांनी ₹1 लाख, गिरीश पाटील यांनी ₹51 हजार, हरीश देधमुख यांनी ₹11 हजार, तर हेमंत पाटील यांनी ₹11 हजार रुपयांची देणगी दिली.

शेवटी, सभापती अशोक पाटील, विक्रांत पाटील, महेंद्र बोरसे यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला असून मराठा समाजाच्या ऐक्याचा आणि प्रगतीचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 121500

22 Ct सोने 91.60% : ₹. 111300

18 Ct सोने 75.00% : ₹. 92400

शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed