सारबेटे बु. येथे सरपंच व कुटुंबीयांवर हल्ला — चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
New-Doc-10-05-2025-07.01.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर घरकुल योजनेच्या पैशांवरून वाद झाल्याने तालुक्यातील सारबेटे बु. येथे महिला सरपंचासह तिच्या दोन भावांना व भाच्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सरफराज खा शफीक खा, मोहसीन खा शफीक खा, फिरोज खा शफीक खा, आणि मोईन खा शफीक खा या चौघांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास महिला सरपंच घरी असताना आरोपी चौघे अंगणात येऊन शिवीगाळ करू लागले. “घरकुलाचे पैसे का टाकत नाहीस” असा सवाल करत त्यांनी सरपंचाला मारहाण केली. सरपंचाने “मी पैसे टाकत नाही, ते बीडीओ आणि इंजिनिअर टाकतात” असे सांगितले असता आरोपी संतापले आणि पुन्हा शिवीगाळ व मारहाण केली.

दरम्यान, सरपंचाला वाचवण्यासाठी तिचे भाऊ साबीर खा आणि इरफान खा, तसेच भाचा तोहीद खा धावून आले असता त्यांनाही लोखंडी रॉड, वीट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर प्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ग्रे. पीएसआय रामकृष्ण कुमावत पुढील तपास करीत आहेत.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 121500

22 Ct सोने 91.60% : ₹. 111300

18 Ct सोने 75.00% : ₹. 92400

शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed