मराठा समाजाचा गुणगौरव व वार्षिक सर्वसाधारण सभा आज अमळनेरमध्ये.

0
New-Doc-10-05-2025-06.44.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :तालुका मराठा समाजातर्फे समाजभूषण पुरस्कार व गुणवंतांचा गुणगौरव समारंभ तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा आज, ५ ऑक्टोबर रोजी कै. सुंदराबाई दिनकरराव देशमुख मराठा मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे.

सकाळी १० वाजता आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या सोहळ्याची सुरुवात होणार असून, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील, ढेकूचे उपसरपंच नथु गुणवंतराव सोनवणे, अमळगावचे लोकनियुक्त सरपंच गिरीश सोनजी पाटील, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, आरटीओ मयूर निकम, तसेच ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना मराठा समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार स्मिता वाघ, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, आणि माजी नगराध्यक्ष विनोद पाटील उपस्थित राहणार आहेत.
तसेच दहावी, बारावी आणि विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांचा सन्मानही या कार्यक्रमात होणार आहे.

दुपारी १ वाजता मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा त्याच ठिकाणी होणार आहे.
मराठा समाजातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 121500

22 Ct सोने 91.60% : ₹. 111300

18 Ct सोने 75.00% : ₹. 92400

शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed