आज अमळनेरमध्ये बच्चू कडू यांची शेतकरी सभा — “हेक्टरी ५० हजारांसाठी एकच हाक!”

0
New-Doc-10-05-2025-06.29-1.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर । जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज, ५ ऑक्टोबर रोजी, अमळनेर येथे भव्य शेतकरी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

सभेचे ठिकाण — इंदिरा भवन हॉल, अमळनेर.
वेळ — दुपारी 2 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या सभेत शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागणीवर — “हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत” या विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. जिल्हाभरातील तरुण, शेतकरी आणि ग्रामस्थ या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांच्या या सभेला राजकीय भेद विसरून सर्वपक्षीय शेतकरी बांधवांनी समर्थन दिले आहे. सोशल मीडियावर “#हेक्टरी५०हजार” हा ट्रेंडही गाजत असून, अनेक शेतकरी म्हणत आहेत —

“पक्ष काहीही असो, पण शेतकरी म्हणून आम्ही बच्चू कडू यांच्या सभेला हजर राहणार आहोत.”

या सभेचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री. संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 121500

22 Ct सोने 91.60% : ₹. 111300

18 Ct सोने 75.00% : ₹. 92400

शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed