अमळनेरमध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन थांबवा.                                                           नो पार्किंगमध्ये वाहनं उभी करणाऱ्यांवर पोलिसांची कडक कारवाई – ₹15,700 दंड वसूल.

0
New-Doc-10-04-2025-23.14.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर शहरातील मोरया हॉस्पिटल, बहुगुणे हॉस्पिटल तसेच धुळे रोडवरील आयडीएफसी आणि ॲक्सिस बँक परिसरात नो पार्किंग झोनमध्ये उभी केलेली वाहनं पोलिसांनी आज हटवली. या मोहिमेतून एकूण ₹15,700 इतका दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार विनय पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल विलास बागुल यांनी अंमलात आणली.

पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, शहरात नो पार्किंग झोनमध्ये वाहन उभी केल्यास तात्काळ दंडात्मक कारवाई होईल. अशा प्रकारच्या मोहिमा दररोज राबविण्यात येतील.

वाहतुकीच्या नियमांचं पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असून, सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 121500

22 Ct सोने 91.60% : ₹. 111300

18 Ct सोने 75.00% : ₹. 92400

शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed