पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांचे वर्तन असंवैधानिक – एकता संघटनेची कारवाईची मागणी..
24 प्राईम न्यूज 4 Oct 2025

जळगाव : जळगाव जिल्हा एकता संघटनेने आज पत्रकार परिषद घेऊन जामनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या असंवैधानिक आणि पक्षपाती वर्तनावर तीव्र आक्षेप नोंदवला. अलिकडेच जामनेरमध्ये झालेल्या मॉब लिंचिंग प्रकरणात कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांनी गुन्हेगारांना संरक्षण दिल्याचा आरोप संघटनेने केला.
१ ऑक्टोबर रोजी कासार यांनी पोलिस गणवेश परिधान करून सांप्रदायिक रंग असलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला, तलवारी फडकवल्या आणि आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्यांसोबत मंच शेअर केला, असे संघटनेने नमूद केले. या कृत्यामुळे भारतीय संविधान, महाराष्ट्र पोलीस नियमावली, केंद्रीय सेवा आचारसंहिता नियम १९६४ आणि नवीन बीएनएस कायदा २०२३ चे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला.
संविधानातील कलम १४, १५, २५ आणि २८ तसेच शस्त्र कायदा १९५९ च्या कलम ४ चे उल्लंघन झाल्याचे सांगत संघटनेने मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, मानवी हक्क आयोग, अल्पसंख्याक आयोग आणि विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. एकता संघटनेच्या मुख्य मागण्या
१) निरीक्षक कासार यांच्यावर विभागीय व शिस्तभंगाची कारवाई करावी.
२) त्यांना तात्काळ पदावरून दूर करून बदली करावी.
३) त्यांनी संरक्षण दिलेल्या घटकांवर कठोर कारवाई करावी.
४) तलवारी घेऊन फिरणाऱ्यांवर आणि त्यांना शस्त्रे पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन २० फोटो आणि ३ व्हिडिओंसह सविस्तर तक्रार सादर केली. तसेच अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी व मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या सचिव वैशाली चौहान यांच्याकडेही घटनेचा तपशील, फोटो व व्हिडिओ पुरावे सादर केले.
मुफ्ती खालिद, फारूक शेख, नदीम मलिक, सय्यद चाँद, दानियाल अलाउद्दीन, हाफिज रहीम पटेल, हाफिज इम्रान, हाफिज गुफ्रान, हाफिज वसीम पटेल, हाफिज उमर नसीर, अनीस शाह, अन्वर शिकलगार, फिरोज शेख, मतीन पटेल, युसूफ खान, इरफान सय्यद, अधिवक्ता अब्दुल्ला पटेल, शेख अब्दुल पटेल, अब्दुल रवीद पटेल, अशफाक पटेल, जैद अयुब खान, अममार रईस खान आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 121000
22 Ct सोने 91.60% : ₹. 110800
18 Ct सोने 75.00% : ₹. 92000
शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
