अमळनेर रेल्वे स्थानकावर हरवलेला अल्पवयीन मुलगा ४९ हजार रुपयांसह RPFच्या ताब्यात; बालकल्याण समितीकडे सुपूर्द..

0
New-Doc-10-04-2025-09.50.jpg


आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर एक अल्पवयीन मुलगा बेवारस अवस्थेत आढळून आला. रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) दक्षतेमुळे मुलाला सुरक्षित ताब्यात घेऊन चौकशीसाठी नेण्यात आले.

निरीक्षक सत्यजीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खेलसिंह मीणा, एएसआय कुलभूषणसिंह चौहान आणि कॉन्स्टेबल अमित कुमार यांनी शनिवारी सकाळी ९.१५ वाजता गस्तीदरम्यान मुलगा फिरताना पाहिला.

चौकशीत त्याने आपले नाव रघुराज पटेल, वडिलांचे नाव अभिनंदन पटेल, रा. गाव टिकामऊ, जिल्हा महोबा (उत्तर प्रदेश) असे सांगितले. तो चित्रकूटला जाण्यासाठी घरातून निघाला होता, मात्र चुकीच्या गाडीत बसल्याने अमळनेर येथे पोहोचला. विशेष म्हणजे, त्याच्याकडे घरातील लॉकरमधून घेतलेले ४९ हजार रुपये रोख आढळले.

मुलाला कुटुंबीयांचा कोणताही मोबाईल क्रमांक माहित नव्हता. RPFने गुगलच्या सहाय्याने संबंधित टिकामऊ पोलिसांशी संपर्क साधला असता, मुलगा हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी त्याचे कुटुंबीय पोलिस ठाण्यात उपस्थित असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर FIR नोंदवण्यात आली नाही.

नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून मुलगा व त्याच्याकडील रोख रक्कम जळगाव बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले. मुलगा सुरक्षित सापडल्याने त्याच्या कुटुंबीयांनी अमळनेर RPFचे आभार मानले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 121000

22 Ct सोने 91.60% : ₹. 110800

18 Ct सोने 75.00% : ₹. 92000

शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed