सेवा सप्ताहांतर्गत लायन्स क्लब तर्फे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर.

0
New-Doc-10-04-2025-07.13.jpg

अमळनेर :लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे सेवा सप्ताह उपक्रमांतर्गत महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी, होमगार्ड तसेच नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन इंदिरा गांधी भवन येथे करण्यात आले.

हे शिबिर शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत पार पडले. यामध्ये बीपी, रॅन्डम ब्लड शुगर, हिमोग्लोबिन, स्त्रीरोग तपासणी, नेत्र तपासणी, फिजिओथेरपी तसेच हृदयरोग तपासणी अशा विविध सेवांचा लाभ २२० महिला व पुरुष कर्मचारी यांनी घेतला.

शिबिरासाठी हृदयरोग तज्ञ डॉ. निखिल बहुगुणे, डॉ. युसुफ पटेल, डॉ. मिलिंद नवसारीेकर, अस्थिरोग तज्ञ डॉ. सुमित सूर्यवंशी, नेत्ररोग तज्ञ डॉ. नरेंद्र महाजन, शल्य चिकित्सक डॉ. पंकज चौधरी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. रवींद्र जैन व डॉ. स्वप्ना पाटील तसेच फिजिओथेरपिस्ट डॉ. ऋतिक कोठारी यांनी आपली सेवा दिली.

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, होमगार्ड कमांडिंग अरुण नेरकर, नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांच्यासह महसूल, पोलीस व अग्निशमन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “धकाधकीच्या जीवनशैलीत वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे. अशा शिबिरांचा कर्मचारी वर्गाला नक्कीच फायदा होतो,” असे ते म्हणाले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सेक्रेटरी महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. किशोर शहा, डॉ. रवींद्र जैन यांच्यासह सदस्य योगेश मुंदडा, विनोद अग्रवाल, एस. डी. भरुचा, महावीर पहाडे, रवींद्र कॉलरा, राजेश जीवनानी, शेखर धनगर, कमलेश भंडारी, चेतन जैन, प्रदीप जैन, अजय हिंदुजा, उदय शहा, महेश पवार, अभिनय मुंदडा, पंकज मुंदडा आदींनी विशेष परिश्रम घेतले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 121000

22 Ct सोने 91.60% : ₹. 110800

18 Ct सोने 75.00% : ₹. 92000

शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed