सेतू चालक व मुद्रांक विक्रेत्यांना तहसीलदारांचा इशारा – प्रतिज्ञापत्र साध्या कागदावरच घ्यावे..

0
New-Doc-10-04-2025-07.03.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर : शासनाने कागदपत्रांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्र आता मुद्रांकावर घेण्याची सक्ती नसल्याचे स्पष्ट आदेश काढलेले असतानाही अमळनेर तालुक्यातील काही सेतू चालक व मुद्रांक विक्रेते विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून मुद्रांकावरच प्रतिज्ञापत्र घेण्याचा गैरप्रकार करत असल्याचे उघड झाले आहे.

या पार्श्वभूमीवर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी संबंधितांची बैठक घेऊन हा प्रकार तातडीने बंद करण्याचे आदेश दिले. तसेच आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.

शासनाने विविध दाखले अथवा कागदपत्रांसाठी मुद्रांकाऐवजी साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरण्याचा नियम केला आहे. मात्र काही सेतू चालक व विक्रेते यांनी संगनमत करून नागरिकांकडून अतिरिक्त खर्च वसूल करण्यासाठी मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र सक्तीचे केले होते. याबाबत तक्रारी वाढू लागल्यानंतर प्रशासनाने पावले उचलली.

तहसीलदार सुराणा यांनी स्पष्ट केले की, नवीन प्रस्तावासोबत बनावट दाखले जोडल्यास तो प्रस्ताव परत न पाठवता थेट रद्द केला जाईल. यामुळे होणारा आर्थिक भुर्दंड सेतू चालक आणि ग्राहक यांनाच सहन करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 121000

22 Ct सोने 91.60% : ₹. 110800

18 Ct सोने 75.00% : ₹. 92000

शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed