शेतकरी कर्जमाफीसाठी अमळनेरात बच्चू कडूंची जाहीर सभा ५ ऑक्टोबरला
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर येथे ५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता इंदिरा भुवन येथे जाहीर सभा होणार आहे.
या सभेत जिल्ह्यातील शेतकरी बांधव, विद्यार्थी व दिव्यांगांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शेतकरी अडचणीतून बाहेर निघाला नाही तर व्यापार, शिक्षणासह समाजातील सर्व क्षेत्रांवर परिणाम होईल. त्यामुळे शेतकरी वाचवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
सभेसाठी प्रहार जनशक्ती पक्षासोबतच महाविकास आघाडीचे घटक पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचे सहकार्य मिळणार आहे.
या सभेला माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनाही कर्जमाफीवर भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सभेच्या आयोजनासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अमळनेर तालुकाध्यक्ष संतोष पाटील, संचालक प्रा. पवन पाटील, युवक अध्यक्ष रवी पाटील, दिव्यांग अध्यक्ष दिलीप कासार, प्रदीप बोरसे व दिनेश पाटील यांनी तयारी सुरू केली आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 121000
22 Ct सोने 91.60% : ₹. 110800
18 Ct सोने 75.00% : ₹. 92000
शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
