अमळनेरात लायन्स क्लब तर्फे तणाव व्यवस्थापन सेमिनार.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – लायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या सेवा सप्ताह उपक्रमांतर्गत लायन्स क्लब, अमळनेर तर्फे मानसिक स्वास्थ्य व कल्याणासाठी तणाव व्यवस्थापन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. हा सेमिनार रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सुजान मंगल कार्यालय, अमळनेर येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून धुळे येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रोहन शाह उपस्थित राहणार आहेत.
लायन्स क्लबने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तणाव हा प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचा मूक साथीदार बनला आहे. यामुळे चिंता, नैराश्य, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगासारख्या विकारांना खतपाणी मिळते. या पार्श्वभूमीवर सेमिनारमध्ये तणाव नियंत्रणासाठी वैज्ञानिक उपाय, व्यावहारिक मार्गदर्शन आणि सोपी तंत्रे शिकवली जाणार आहेत.
हा उपक्रम विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यावसायिक, महिला मंडळे, डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांसाठी उपयुक्त ठरणार असून, शाळा-महाविद्यालये, कंपन्या व विविध संस्थांनी आपल्या विद्यार्थी, कर्मचारी व सदस्यांना सहभागासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष ला. प्रदीप जैन, प्रोजेक्ट चेअरमन ला. चेतन जैन, सचिव ला. महेंद्र पाटील, कोषाध्यक्ष ला. नितीन विंचूरकर तसेच सर्व सदस्यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 121000
22 Ct सोने 91.60% : ₹. 110800
18 Ct सोने 75.00% : ₹. 92000
शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
