‘लाडकी बहीण’ योजनेत नवा नियम : वडील किंवा पतीचा ‘आधार’ सक्तीचा..

0
New-Doc-10-02-2025-07.30.jpg

24 प्राईम न्यूज 2 Oct 2025


राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल करत नवा नियम लागू केला आहे. यानुसार ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान लाभार्थी महिलेला स्वतःच्या आधारसोबत वडील किंवा पतीचा ‘आधार’ तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामागचा उद्देश म्हणजे लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा आणि गैरव्यवहार रोखला जावा हा आहे.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत जाहीर झालेल्या या योजनेत प्रचंड गैरप्रकार उघडकीस आले होते. काटेकोर तपासणीत तब्बल २६.३४ लाख बनावट लाभार्थी समोर आले. धक्कादायक म्हणजे अनेक पुरुष आणि सरकारी कर्मचारीही लाभार्थ्यांच्या यादीत आढळले. परिणामी राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार विवाहित महिलांच्या बाबतीत पतीचे उत्पन्न तपासले जाणार असून अविवाहित महिलांसाठी वडिलांचे उत्पन्न पाहिले जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अर्जदार अपात्र ठरणार आहेत.

पूर्वी फक्त महिलांचे वैयक्तिक उत्पन्न पाहिले जात होते. त्यामुळे गृहिणी किंवा कमी उत्पन्न असलेल्या महिला आपोआप पात्र ठरत होत्या. मात्र तपासात असे दिसून आले की अनेक कुटुंबांचे उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेपेक्षा खूपच जास्त होते. त्यामुळे सरकारने कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित निकष लागू केले आहेत.

महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्याने सांगितले की, “यात काही चुकीचे नाही. सरकारला खऱ्या अर्थाने ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंतच पैसा पोहोचवायचा आहे. आधार, पॅन आणि बँक खाते जोडल्यामुळे उत्पन्न तपासणी अधिक सोपी झाली आहे.”

यामुळे आता लाखो अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर काढले जात असून खरी पात्र बहिणींनाच ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळणारआहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 121000

22 Ct सोने 91.60% : ₹. 110800

18 Ct सोने 75.00% : ₹. 92000

शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed