१७ वर्षे देशसेवा करून जवान विजय किरण संदानशिव यांचा अमळनेरात भव्य सत्कार..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : भारतीय सेनेतील महार रेजिमेंटचे शूर जवान विजय किरण संदानशिव यांनी तब्बल १७ वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्ती घेतली आहे. पुलवामा सारख्या युद्धजन्य परिस्थितीत तसेच “ऑपरेशन सिंदूर”मध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता.
सेवापूर्ती निमित्त त्यांच्या गावी अमळनेर येथे नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. देशसेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे, विजय किरण संदानशिव यांचे धाकटे बंधू विनोद संदानशिव हे डी.बी. पोलीस सेवेत कार्यरत असून कुटुंबाच्या शौर्य परंपरेत त्यांनीही योगदान दिले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 119200
22 Ct सोने 91.60% : ₹. 109200
18 Ct सोने 75.00% : ₹. 90600
शुद्ध चांदी 999%:₹. 1500/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
