अमळनेर शहरात बेशिस्त पार्किंगचा कहर – नागरिक हैराण, प्रशासन मौन !
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर :शहरातील मुख्य रस्त्यांवर, हॉस्पिटल्स, बँका, क्लासेस व गर्दीच्या ठिकाणी बेशिस्त पार्किंग हा नागरिकांच्या त्रासाचा मुख्य विषय ठरला आहे. रुग्णवाहिका अडकणे, बँकांसमोर गाड्यांची रांग, क्लासेसजवळ गर्दीत वाढलेली कोंडी – या सर्वामुळे नागरिकांची होरपळ सुरू असून, प्रशासन व वाहतूक विभागाकडून ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
ठिकठिकाणी पार्किंगचा गोंधळ
हॉस्पिटल, सुभाष चौक, बाजारपेठ, एस.टी. स्टँड परिसर, बँका, खासगी क्लासेस, कॉलेज रोड, धुळे रोड याठिकाणी अवैध पार्किंगचा गंभीर प्रश्न.
“नो पार्किंग” बोर्ड असूनही नियमभंग सर्रास सुरूच दोन्ही बाजूंनी उभ्या वाहनांमुळे आपत्कालीन सेवा ठप्प.
प्रशासनाची भूमिका संशयास्पद
सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप – “कारवाई निवडक ठिकाणीच, बाकी ठिकाणी सर्रास डोळेझाक.”
नागरिकांच्या ठाम मागण्या सर्व हॉस्पिटल, बँका, क्लासेसजवळ “नो पार्किंग” झोन स्पष्ट करावेत सीसीटीव्हीद्वारे नियमभंग करणाऱ्यांवर त्वरित दंड. कोणताही पक्षपात न करता सर्वांवर नियम समानपणे लागू व्हावेत शहरात सुयोग्य वाहनतळ व स्पष्ट मार्किंग करावं स्वतंत्र वाहतूक शाखा स्थापन करून नियंत्रण वाढवावं नागरिकांचा सवाल – “शहरातील पार्किंग प्रश्न सोडवण्याची जबाबदारी प्रशासन घेणार की नागरिकांनीच त्रास सहन करत राहायचं?”
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 121000
22 Ct सोने 91.60% : ₹. 110800
18 Ct सोने 75.00% : ₹. 92000
शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
