ऐन दिवाळीत एसटीची १० टक्क्यांची भाडेवाढ; प्रवाशांचे आर्थिक गणित बिघडणार..

0
New-Doc-10-01-2025-07.23.jpg

24 प्राईम न्यूज 1 Oct 2025


मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ऐन दिवाळीत भाडेवाढ करून प्रवाशांना धक्का दिला आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या २२ दिवसांच्या कालावधीत एसटीच्या प्रवासासाठी १० टक्के भाडेवाढ लागू राहणार आहे.

विशेष म्हणजे, अॅडव्हान्स बुकिंग केलेल्या प्रवाशांनाही जुना आणि नवीन दरातील फरक वाहकाकडे जमा करावा लागेल, असे परिपत्रक एसटी प्रशासनाने जारी केले आहे.

शिवनेरी आणि शिवाई बस सोडून इतर सर्व बस सेवांवर ही भाडेवाढ लागू होईल. साधी, जलद बससेवा, निमआराम, साधी शयनयान (स्लीपर), शिवशाही आणि जनशिवनेरी यांसह विविध बसच्या तिकिटांवर प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागतील.

दिवाळीच्या सुट्टीनिमित्ताने गावी जाण्याचा बेत आखणाऱ्या प्रवाशांचे मात्र आर्थिक गणित या निर्णयामुळे बिघडण्याची शक्यता आहे.


रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 119200

22 Ct सोने 91.60% : ₹. 109200

18 Ct सोने 75.00% : ₹. 90600

शुद्ध चांदी 999%:₹. 1500/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed