अमळनेर नगरपरिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर – दोन प्रभागात बदल..

0
New-Doc-10-01-2025-07.07.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर : नगरपरिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून दोन प्रभागांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने २८९ नगरपालिकांचा मतदार यादी कार्यक्रमही जाहीर केला आहे.

शहरातील प्रभाग रचनांवर नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे व मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सुनावणी घेऊन आयोगाला अहवाल पाठवला होता. त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.

नव्या बदलांनुसार वाडी चौक परिसर, जो यापूर्वी प्रभाग १२ मध्ये होता, आता प्रभाग १० मध्ये जोडण्यात आला आहे. तसेच प्रभाग १० मधील नदीकाठावरील बेलदार मोहल्ल्याचा काही भाग नव्याने प्रभाग ४ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

मतदार संख्येनुसार शहरातील मतदान केंद्रांची संख्या वाढून १०८ वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 119200

22 Ct सोने 91.60% : ₹. 109200

18 Ct सोने 75.00% : ₹. 90600

शुद्ध चांदी 999%:₹. 1500/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed