सतीमातेचं दर्शन करून घरी निघाले, वाटेत काळाचा घाला.                                           दुचाकीची गायीला धडक; पत्नी ठार, पती जखमी..

0
New-Doc-10-01-2025-06.43.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर –नवरात्रोत्सवाच्या अष्टमीच्या दिवशी सतीमातेचं दर्शन घेऊन परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. दुचाकी गायीला धडकल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना ३० सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी टाकरखेडा रस्त्यावर बुलढाणा अर्बन बँकेच्या गोदामासमोर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर नारायण ठाकरे (रा. आर.के. नगर) हे पत्नी मंगलाबाई यांना घेऊन मोटरसायकल क्रमांक एमएच-१९ डीएन-८५१४ वर सतीमातेच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून परत येताना अचानक रस्त्यात गाय आडवी आली. वेग नियंत्रित न राहिल्याने मोटरसायकल गायीला धडकली आणि दाम्पत्य खाली पडले.

या अपघातात मंगलाबाई ठाकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मधुकर ठाकरे यांच्या तोंडाला दुखापत होऊन त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अशोक ठाकरे यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.


रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 119200

22 Ct सोने 91.60% : ₹. 109200

18 Ct सोने 75.00% : ₹. 90600

शुद्ध चांदी 999%:₹. 1500/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed