मालेगावची बेटी – डॉ. मरियम अफीफा अंसारी : भारताची पहिली मुस्लिम महिला न्युरोसर्जन..
आबिद शेख/अमळनेर

मालेगाव येथील गरीब कुटुंबातील आणि आलिमा यांची कन्या डॉ. मरियम अफीफा अंसारी यांनी संघर्षाच्या मार्गावरून चालत आज भारताची शान बनली आहे.
उर्दू मीडियमच्या छोट्याशा शाळेतून शिक्षणाची सुरुवात झालेल्या मरियम अफीफा यांनी परिस्थिती प्रतिकूल असूनही स्वप्नांच्या वाटचालीला कधीही अडथळा येऊ दिला नाही. दहावीला गोल्ड मेडल मिळवल्यानंतर उस्मानिया मेडिकल कॉलेजमधून MBBS पूर्ण केले. त्यानंतर MS (जनरल सर्जरी), DNB, MRCS (UK) आणि MCh (न्युरोसर्जरी) यांसारख्या कठीण अभ्यासक्रमात यश मिळवत त्यांनी इतिहास रचला.
आज त्या भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला न्युरोसर्जन म्हणून कार्यरत असून ऑपरेशन थिएटरमध्ये आपल्या कौशल्याने चमकत आहेत. डॉ. मरियम अफीफा अंसारी लाखो मुलींसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.
अडथळे कितीही असले तरी स्वप्नांमध्ये ताकद आणि ते पूर्ण करण्याची जिद्द असेल तर यशाला कोणीही रोखू शकत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. मरियम अफीफा अंसारी.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 119200
22 Ct सोने 91.60% : ₹. 109200
18 Ct सोने 75.00% : ₹. 90600
शुद्ध चांदी 999%:₹. 1500/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
