वाळू माफियांवर गुन्हे दाखल… तरीही आरोपी मोकाट – प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
New-Doc-09-30-2025-07.17.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर – वाळू माफियांवर भारतीय दंड संहिता कलम 186, 353, 504, 506, 379 अन्वये गंभीर गुन्हे दाखल झालेले असूनदेखील संबंधित आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. एवढे गंभीर कलमे लागूनही आरोपी अमळनेर शहरात मोकाट फिरताना दिसत आहेत, ही बाब नागरिकांत तीव्र संताप निर्माण करणारी ठरत आहे.

काही दिवसांपूर्वीच तालाठ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याचे प्रकार ताजे असतानाच अशा गुन्हेगारांना मोकळीक दिल्यास पुन्हा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा धोका संभवतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासनावर आरोप आहे की, आरोपींवर कारवाई करण्यात जाणूनबुजून विलंब केला जात आहे. वाळू माफियांचा थेट प्रशासनावर दबाव आहे काय? असा प्रश्न आता सर्रास विचारला जात आहे. नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला तात्काळ अटक करून दाखविण्याची मागणी केली आहे.


रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 119100

22 Ct सोने 91.60% : ₹. 109100

18 Ct सोने 75.00% : ₹. 90500

शुद्ध चांदी 999%:₹. 1500/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed