अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुस्लिम नेत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रवेश. आ. अनिल पाटील यांच्या उपस्थितीत फटका टाकून स्वागत..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा ओघ सुरू असून माजी मंत्री व आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य मुस्लिम समाजातील नेत्यांनी नुकताच पक्षात प्रवेश केला. आमदार पाटील यांनी फटका टाकून सर्वांचे स्वागत केले.
गेल्या आठवड्यात हिंदू-मुस्लिम समाजातील काही माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ज्येष्ठ मुस्लिम नेते, माजी नगरसेवक तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यामध्ये काँग्रेस नेते आमीरखा मिस्तरी, हाजी दबिरखा पठाण, माजी नगरसेवक रहेमान मेंबर, निवृत्त नायब तहसीलदार साबीर खान पठाण, तौसिफ हाजी शेखा, जफर मण्यार, साबीर पठाण, कादीर खा पठाण, फरदीन खा आदी मान्यवरांचा समावेश आहे.
या प्रवेश सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खाटीक, आरीफ पठाण, सैय्यद आबीद अली, कलीम शेख, इम्रान शेख आदी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार अनिल पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत करत शहराच्या विकासासाठी व समाज बांधवांच्या हितासाठी कटीबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 119100
22 Ct सोने 91.60% : ₹. 109100
18 Ct सोने 75.00% : ₹. 90500
शुद्ध चांदी 999%:₹. 1500/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
