कॅन्सरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात : इर्शाद भाई जागिरदार यांच्याकडून मदतीचे चेक सुपूर्द..
24 प्राईम न्यूज 30 Sep 2025

धुळे शहरातील अलीम खान हे कॅन्सरग्रस्त असून त्यांना एमआरआय स्कॅन चाचणी करण्याची आवश्यकता होती. तसेच सलीम शेख शब्बीर यांना देखील पीईटी स्कॅन करण्यासाठी तातडीने आर्थिक मदतीची गरज होती.
या गंभीर परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर धुळे शहरातील आरोग्य मित्र नुरा भाई शेख यांच्या माध्यमातून दोघेही रुग्ण इर्शाद भाई जागिरदार यांच्या डीएलएल कार्यालयात आले. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत इर्शाद भाई जागिरदार यांनी पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला व दोघांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचे चेक सुपूर्द केले.
या मदत कार्याच्या वेळी मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (MIM) चे मा. नगरसेवक नासीर भाई पठाण उपस्थित होते.
इर्शाद भाई जागिरदार यांनी सांगितले की,
“समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. माझ्या परीने जेवढे शक्य होईल तेवढे मदतकार्य मी करत राहीन.”
धुळे शहरात कॅन्सरग्रस्त व गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना वेळोवेळी अशा प्रकारे मदतीचा हात मिळत असल्याने रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी दिलासा व्यक्त केला आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 119100
22 Ct सोने 91.60% : ₹. 109100
18 Ct सोने 75.00% : ₹. 90500
शुद्ध चांदी 999%:₹. 1500/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
