पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट अतिरिक्त मदत देण्याची मागणी — माजी आमदार साहेबराव पाटील यांचे मुख्यमंत्रींकडे निवेदन..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर जून ते सप्टेंबर २०२७ या चालू पावसाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना केंद्र / राज्य आपत्ती निधीच्या निकषाबाहेर सरसकट अतिरिक्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार व कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
श्री. पाटील यांनी सादर केलेल्या निवेदनात २०१४, २०२३ व २०२४ मधील शासन निर्णयांचा दाखला देत २०२७ मध्ये दिली जाणारी मदत तुटपुंजी असल्याचे स्पष्ट केले आहे. २ हेक्टर मर्यादित जिरायत शेतीसाठी फक्त रु. ८,५००/-, बागायत शेतीसाठी रु. १७,०००/- आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी रु. २२,९००/- इतकीच मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत अन्यायकारक असून शेतकऱ्यांच्या अपेक्षांपेक्षा खूपच कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी याआधी २०१४ आणि २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना अधिक दराने मदत दिल्याचेही निदर्शनास आणले. त्याच धर्तीवर २०२७ मधील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांनाही सरसकट व वाढीव अनुदान देण्याची गरज असल्याचे साहेबराव पाटील यांनी ठामपणे मांडले आहे.
“मदत करा… मदत करा…!!!” असे आर्जवी आवाहन करत मुख्यमंत्री यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, श्री. अजित पवार, मदत व पुनर्वसनमंत्री श्री. मकरंद जाधव (पाटील), जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनाही निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 119100
22 Ct सोने 91.60% : ₹. 109100
18 Ct सोने 75.00% : ₹. 90500
शुद्ध चांदी 999%:₹. 1500/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
