तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी कन्या हायस्कूलची बाजी ; गायत्री बोरसे तालुक्यात प्रथम.

0

अमळनेर /आबिद शेख 

अमळनेर  : 54 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अमळनेर येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या विद्यार्थिनीने घवघवीत यश संपादन केले आहे.

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कूलची इयत्ता 10 वीची विद्यार्थिनी *कु. गायत्री धनराज बोरसे* हिने माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून *प्रथम क्रमांक* पटकावला आहे.

भिका यशोद चौधरी हायस्कूल, शिरसाळे येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. गायत्रीने *’शाश्वत आणि विकसित भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावोन्मेष’* या मुख्य विषयांतर्गत उत्कृष्ट वैज्ञानिक प्रकल्प सादर केला. तिला विज्ञान शिक्षक *दीपक रामभाऊ महाजन* यांचे मार्गदर्शन लाभले.

 

तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शाळेत आयोजित विशेष गौरव सोहळ्यात अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, संचालक अॅड. अशोक बाविस्कर, शिक्षणतज्ज्ञ गोकुळ पाटील यांच्या हस्ते गायत्रीचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजीव पाटील, कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे, ज्येष्ठ शिक्षक संजय जगताप यांनी गायत्रीला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मोरे यांनी केले तर आभार किशोर अहिरराव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed