जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सरचिटणीस फारुक शेख यांचा WIFA कडून सन्मान..

0
New-Doc-09-27-2025-22.30.jpg

24 प्राईम न्यूज 27 Sep 2025


मुंबई : जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सरचिटणीस फारुक शेख यांना महाराष्ट्र राज्याची फुटबॉल संघटना असलेल्या WIFA तर्फे गौरविण्यात आले. शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईतील कूपरेज ग्राउंडच्या मीडिया हॉलमध्ये WIFA चे अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी फारुक शेख यांना लॅपटॉप भेट देऊन सन्मानित केले.

या वेळी सर्व जिल्ह्यांना WIFA कडून ₹१ लाख तर डॉ. विश्वजित कदम यांच्याकडून ₹५० हजार फुटबॉल उपक्रमांसाठी प्रदान करण्यात आले. तसेच २०२४/२५ हंगामातील उपविजेत्या संघांच्या कर्णधारांना फारुक शेख आणि अजगर पटेल यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

वार्षिक सर्वसाधारण सभेत खासदार क्रीडा महोत्सवात फुटबॉलचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. फारुक शेख यांच्या सूचनेनंतर सभागृहाने तत्काळ मान्यता देत हा ठराव भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडे पाठवण्याचे ठरविले.

दरम्यान, जळगाव जिल्ह्याला २५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय ज्युनियर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 117800

22 Ct सोने 91.60% : ₹. 107400

18 Ct सोने 75.00% : ₹. 89500

शुद्ध चांदी 999%:₹. 1470/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed