अमळनेर येथे गायत्री ट्रॅव्हल्स दुकानात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीवर वेळीच नियंत्रण..

0
New-Doc-09-28-2025-06.44.jpg

आबिद शेख/अमळनेर -अमळनेर शहरातील भागवत रोडवरील गायत्री ट्रॅव्हल्स या दुकानात शनिवारी रात्री अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. पावसाळी वातावरण असतानाही काही क्षणांतच आगीचा धूर परिसरात पसरला. नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दुकानातील काही साहित्याचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी झाली नाही.

वेळीच पोहोचलेल्या अग्निशामक दलामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 117800

22 Ct सोने 91.60% : ₹. 107400

18 Ct सोने 75.00% : ₹. 89500

शुद्ध चांदी 999%:₹. 1470/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed