जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा..

आबिद शेख/अमळनेर जळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे यांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजेपासून ते सोमवार दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत या पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे गडगडाटासह विजांचा कडकडाट ३० ते ४० किमी/ता. वेगाचे वारे
अत्यंत मुसळधार सरींची शक्यता
सोमवारी सकाळनंतर पावसाची तीव्रता कमी होऊन हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मात्र, नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा तसेच वीजेच्या तारा, झाडे आणि ओढ्याजवळ जाणे टाळावे, असे आवाहन तहसीलदार सुराणा यांनी केले आह.
