अमळनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद. आमदार अनिल पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला.

0
New-Doc-09-27-2025-06.43.jpg

आबिद शेख/अमळनेर अमळनेर :महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यात इंदिरा भवन मंगल कार्यालय येथे शुक्रवारी (दि. २६ सप्टेंबर २०२५) शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन आमदार मा. दादासो अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर त्यांनी शिबीराला भेट देवून नागरिकांशी संवाद साधला.

या शिबीरात तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी श्री. नरेंद्र पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती प्रेमलता पाटील, महसूल नायब तहसिलदार श्री. अजय कुलकर्णी, निवासी नायब तहसिलदार श्री. सी.यू. पाटील, निवडणूक नायब तहसिलदार श्री. प्रशांत धमके, संजय गांधी योजना नायब तहसिलदार श्री. राजेंद्र ढोले तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिबीरात नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक अशा सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले. तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध योजना व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

शिबीरात करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण वाटपाचा आढावा :

  • पुरवठा शाखा : १४७ नवीन व दुबार शिधापत्रिका वाटप, ०७ राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य धनादेश, ४१७ डीबीटी प्रक्रिया, २१ नवीन लाभार्थ्यांचे अर्ज.
  • निवडणूक शाखा : ०६ नवीन मतदारांचे नमुना ६, ०२ स्थलांतरित मतदारांचे नमुना ८.
  • सेतु शाखा : ९१९ उत्पन्न दाखले, ५२७ राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रे, ५२ रहिवासी दाखले, ४१ जात प्रमाणपत्रे, ७० आधार नोंदणी, १२१ आधार दुरुस्ती, ०४ ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रे, ०४ नवीन आधार संच, ०५ नैसर्गिक आपत्तीतील पशुहानी प्रकरणे.
  • नगर परिषद : २८ प्रधानमंत्री पर्यावरण आत्मनिर्भर निश्री योजना, ०२ आयुष्यमान कार्ड, ०७ बांधकाम परवानगी, ०६ प्रधानमंत्री आवास योजना गृहप्रवेश, ०२ लाड पागे समिती नेमणूक आदेश, २५० महिलांना दिनदयाळ अंत्योदय योजनेतून कर्जवाटप.
  • महकार विभाग : १२ सीएससी सेंटर वाटप.
  • महावितरण : १२ सोलर रूफ टॉप योजना लाभ.
  • कृषी विभाग : ०३ ट्रॅक्टर, ०२ कुट्टी मशीन, ०४ गटाव्हटर, १२ फवारणी पंप.
  • एकात्मिक बाल विकास योजना : ०२ कन्या भाग्यश्री योजना लाभ.

या शिबीरात सुमारे ११०० ते १२०० नागरिकांनी सहभाग नोंदविला. तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराणा यांनी प्रस्तावना केली, श्री. डी. ए. धनगर (उपशिक्षक, सानेगुरुजी विद्यालय) यांनी सूत्रसंचालन केले तर निवासी नायब तहसिलदार श्री. सी.यू. पाटील यांनी आभार मानले.

या शिबीरामुळे अमळनेर तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा एकाच ठिकाणी लाभ मिळाला असून प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले.


रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 116800

22 Ct सोने 91.60% : ₹. 107400

18 Ct सोने 75.00% : ₹. 88700

शुद्ध चांदी 999%:₹. 1420/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed